Solapur Politics: 'कलंकित नेत्याला प्रवेश देऊ नका', Dilip Mane यांच्याविरोधात भाजपमध्येच बंड

Continues below advertisement
सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाच्या बातमीने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 'घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्याच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत,' असा थेट इशाराच दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणाऱ्या भाजपमध्येच आता अंतर्गत वाद उफाळून आला असून, दिलीप मानेंच्या संभाव्य पक्षप्रवेशाविरोधात भाजप कार्यकर्ते पक्ष कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण चार माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा असताना, मानेंच्या प्रवेशाला झालेला हा विरोध भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola