Ladli Behna Yojana Third Round 2024 : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 29 सप्टेंबरला येणार खात्यात पैसे #ABP Majha

Ladli Behna Yojana Third Round 2024 : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर!  29 सप्टेंबरला येणार खात्यात पैसे #ABP Majha

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या २९ सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. म्हणजेच येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या (अर्जदार) खात्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होतील. 

दरम्यान, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाडकी बहीण योजजनेचा पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यात 17 ऑगस्टला पार पडला होता. यावेळी पहिला हप्त्यात आपण 1 कोटी 7 लक्ष महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरीत केला होता. त्यानंतर लाडकी बहीणचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम 31 ऑगस्टला नागपूरमध्ये पार पडला होता. यावेळी देखील महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरीत केला होता. आता येत्या 29 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता 29 ऑगस्टला जमा होणार आहे. आदिती तटकरे या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी तिसऱ्या हप्ताबाबत माध्यमांना माहिती दिली. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola