Ladki Bahin Yojana Sambhajinagar : लाडकी बहीण योजना; ई-केवायसी करण्यासाठी महिला रांगेत

Continues below advertisement

Ladki Bahin Yojana Sambhajinagar : लाडकी बहीण योजना; ई-केवायसी करण्यासाठी महिला रांगेत

ही बातमी पण वाचा

लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी 'बँक सिडिंग स्टेटस' कसं चेक करायचं? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया!

मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. 14 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी पाठवला जात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये अनेक महिलांना मिळाले आहेत. अजूनही ही प्रक्रिया चालू असून येत्या 17 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्यामुळे अनेक महिलांना हा लाभ मिळणार नाही. याच पार्श्वभूमीवर आपल्या आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक आहे की नाही? कोणते बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे? हे जाणून घेण्याची प्रक्रिया समजून घेऊ या... 

बँकेला आधार संलग्न असणे गरजेचे

लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही पात्र असूनदेखील सरकार तुम्हाला पैसे देणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक सिडिंग स्टेटस जाणून आणि तुम्ही अर्जात दाखल केलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे गरजेचे आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram