Ladki Bahin Yojana advertisement News : लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींसाठी सरकार 200 कोटी खर्च करणार

Continues below advertisement

Ladki Bahin Yojana advertisement News :  लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींसाठी सरकार 200 कोटी खर्च करणार

मुंबई :  राज्य सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणं "मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" या योजनेनुसार पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेला यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर देखील प्रयत्न करण्यात आले. राज्य सरकारकडून 17 ऑगस्टला पुण्यात लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभासाठी मोठा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसीठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.  

राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत माध्यम आराखडा राबविण्यास (Media Plan) व त्याकरिता होणा-या रुपये 199 कोटी 81 लाख 47 हजार 436 रुपयांच्या  खर्चास शासन मान्यता देण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. 

लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी नमूद माध्यम आराखड्यानुसार जाहिरात प्रसिध्दीची कार्यवाही माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेच्या समन्वयानं करायची आहे. 
          
लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी माहितीपट, अॅनिमेशन फिल्म, व्हिडिओ थीम साँग, ऑडिओ साँग, जिंगल्स, स्पॉट तयार करण्यात येणार आहेत. या सर्वांची प्रसिद्धी वर्तमानपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी केंद्र, वाहिन्या, एफएम रेडिओ,कम्युनिटी रेडिओ, स्थानिक लोकल केबल  सिनेमागृह, मुंबई लोकल, एसटी बसेस, आणि रेल्वे स्थानकांवर देखील केली जाणार आहे. चर्चासत्रांचं आयोजन दखील केलं जाणार आहे. बेस्ट बसेस, एसटी डेपोतील स्क्रीन, पीएमपी, सोशल मिडिया आणि डिजीटल मिडिया, ओटीटी माध्यमांवर देखील जाहिरात केली जाणार आहे.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram