Kurla Tree Cutting | कुर्ला ITI परिसरात झाडं तोडण्याचा प्रयत्न, Mangalprabhat Lodha यांच्यावर आरोप

कुर्ला ITI परिसरामध्ये मध्यरात्री वृक्षतोडीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. ठाकरेंच्या Shiv Sena पदाधिकाऱ्यांनी हा प्रयत्न उधळला. कोणत्याही परवानगीशिवाय झाडांच्या कत्तलीचा डाव होता. गेल्याच वर्षी Miyawaki पद्धतीने नऊ हजार झाडं लावण्यात आली होती, तीच झाडं तोडण्याचा प्रयत्न सुरू होता. या प्रकरणी आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, Aaditya Thackeray यांनी मंत्री Mangalprabhat Lodha यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. स्विमिंग पूल बांधण्यासाठी झाडं तोडून जागा मोकळी करण्याचा कट आहे का, असा प्रश्न या संदर्भामध्ये उपस्थित केला जात आहे. हा वृक्षतोडीचा प्रयत्न पर्यावरण आणि नियमांचे उल्लंघन करणारा होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola