
Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरार
Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरार
मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरलेल्या बेस्ट बसने अनेक जणांना धडक दिली आहे. कुर्ला एलबीएस रोडवर मोठा अपघात झालाय. बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात काही जणांचा मृत्यू झालाय तर तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. 20 जण गंभीर जखमी, तिघांचा मृत्यू भरधाव बस ब्रेक फेल झाल्यामुळे मोठी गर्दी असलेल्या मार्केटमध्ये घुसली आहे. त्यानंतर बसने अनेक वाहनांना धडक दिली आहे. तर 20 लोकांना या बसने धडक दिल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत या अपघातात तीन जणांनी जीव गमावलाय. जखमींना बाबा रुग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर लोकांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि ही बस मार्केटमध्ये घुसल्याची माहिती आहे.ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे बोलले जात आहे.