Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी
Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी
मुंबईच्या एलबीएस रोडवर कुर्ला परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. बेस्ट बस कुर्ला येथील गजबजलेल्या परिसरातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट गर्दीत शिरली. या अपघातात अनेकजण चिरडले गेले. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू झाल असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असून बेस्ट प्रशासन आणि कंत्राटी कर्मचारी याबाबत अनेक प्रश्न नव्याने ऐरणीवर आले आहेत. दरम्यान, कालच्या दुर्घटनेत बेस्ट बसमुळे चिरडल्या जाणाऱ्यांमध्ये आफरिन शहा या 19 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. आफरिन हिचा सोमवारी नोकरीचा पहिला दिवस होता. ती कामावरुन घरी परतत असताना बेस्टच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. तर कनीज फातिमा या महिलेचाही अपघातात मृत्यू झाला. त्या एका रुग्णालयात नोकरी करायच्या. काल अपघात घडला तेव्हा फातिमा या रुग्णालयात नाईट ड्युटीसाठी निघाल्या होत्या. ही सगळी माहिती समोर आल्यानंतर नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.