Kurla Bus Accident : कुर्ल्यात बेस्ट बस अपघात प्रकरण;आरोपीचं कुटुंब ABP Majhaवर Exclusive

Kurla Bus Accident : कुर्ल्यात बेस्ट बस अपघात प्रकरण;आरोपीचं कुटुंब ABP Majhaवर Exclusive

कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये काल (सोमवारी 9 डिसेंबर) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसने (Kurla Best Bus Accident) अनेकांना धडक दिली. या अपघातामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 48 ते 50 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सदर बस जवळपास 8 ते 10 वाहनांना उडवत मार्केट परिसरात गेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे, घटनेचा तपास सुरू आहे, तर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या घटनेत मृत कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीसांनी याबाबत सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट लिहून घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे, तर जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola