Kunbi Certificate | कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या प्रक्रिया

कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता स्पष्ट झाली आहे. अर्जदारांनी सर्वप्रथम त्यांच्या पूर्वजांच्या जातीच्या उल्लेखाच्या नोंदी उपलब्ध आहेत का, याची खात्री करावी. या नोंदी आणि त्यांच्या नोंदीपासून आजपर्यंतची त्यांची वंशावळ कशी जुळते याबाबत ते शपथपत्र आणि त्या शपथपत्रामध्ये ज्या ज्या व्यक्तींचा उल्लेख आहे, त्या त्या व्यक्तींच्या नावाने असलेले जातीचे नोंदीचे पुरावे ही सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. आजचा शालेय निर्गम उतारा आणि आधारकार्ड यांसारखी आवश्यक कागदपत्रे घेऊन अर्जदारांना महा ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रावर (गावात्तरावर किंवा तालुक्याला उपलब्ध) त्यांचा अर्ज ऑनलाइन स्वरूपात भरायचा आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी साधारणपणे २१ ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. प्रमाणपत्रासाठी पूर्वजांचा महसुली जातीचा पुरावा आवश्यक असेल. पूर्वजांचा पुरावा नसल्यास रक्तातल्या नात्याच्या नातलगाचा जातीचा पुरावा आवश्यक असेल. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदींच्या आधारे शपथपत्र देणे आवश्यक आहे. महा ऑनलाइन केंद्रावरचा अर्ज तहसील कार्यालयात छाननीसाठी जाईल. त्रुटी नसल्यास ग्रामस्तरीय समितीच्या अभिप्रायासाठी अर्ज पुढे पाठवला जाईल. ग्रामसमितीनंतर अर्ज उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल आणि उपविभागीय अधिकारी अंतिम कुणबी प्रमाणपत्र देतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola