Kunal Sarmalkar Vidhan Sabha|वांद्रे पूर्वमधील बंडखोरी रोखण्यास महायुतीला अपयश,सरमळकर निवडणुकीवर ठाम वांद्रे पूर्व मधील बंडखोरी रोखण्यास महायुतीला अपयश, शिंदेंच्या शिवसेनेचे कुणाल सरमळकर अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम कुणाल सरमळकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत पक्षातील वरिष्ठांना याची कल्पना या आधीच दिल्याची सरमळकर यांची माहिती वांद्रे पूर्व मधील स्थानिकांना स्थानिक उमेदवार हवा होता त्यामुळेच मी निवडणूक लढवत असल्याचं वरिष्ठांना सांगितल्याचं, सरमळकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितला आहे टिक टॅक - कुणाल सरमळकर, वांद्रे पूर्व अपक्ष उमेदवार वांद्रे पूर्व मधील लढत झिशान सिद्दिकी - राष्ट्रवादी काँग्रेस वरुण सरदेसाई, शिवसेना ठाकरे गट कुणाल सरमळकर - अपक्ष उमेदवार तृप्ती सावंत- मनसे
हे ही वाचा...
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची अखेर बदली झाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतंय. उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे.
काँग्रेसचे रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक आक्षेप
रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता.