Kopargaon Taiabai Rescue 2 Man : अंगावरील साडी नदीत फेकून दोघांना जीवनदान; ताईबाईंच्या धाडसाची कहाणी

Continues below advertisement

Kopargaon Taiabai Rescue 2 Man : अंगावरील साडी नदीत फेकून दोघांना जीवनदान; ताईबाईंच्या धाडसाची कहाणी

स्क्रिनवर दिसणाऱ्या या आहेत ताईबाई छबुराव पवार. ताईबाई या कोपरगावच्या रहिवासी आहेत. त्या शेती करतात. ताईबाई आणि त्यांचे पती छबुराव हे त्यांनी केलेल्या धाडसी कृतीमुळे सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. मागील आठवड्यात राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. परिणामी नद्या दुथडी भरुन वाहत होत्या.धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला देखील पूर आला होता. अशातच तीघे जण आपल्या नदी काठी लावलेल्या मोटारी काढण्यासाठी आले होते. तिघं सख्खे भाऊ होते. गोदावरी नदीची नदी पातळी कमालीची होती. पाण्याचा अंदाज न आल्यानं तिखे भाऊ नदीच्या पात्रात पडले. तिघांची जीव-मरणाची लढाई सुरु होती. जीव वाचवण्यासाठी तिघं जोरजोरात ओरढत होते..कुणी तरी आपल्याला वाचवेल अशी आस त्यांना होती..

जिगरबाज ताईबाई  

ताईबाई आणि त्यांचे पती छबुराव हे दोघं जेवण करत बसले होते. दरम्यान त्यांना नदीच्या दिशेने तिघं वाहून जाताना दिसली. तिघं जीव वाचवण्यासाठी जोरजोरात हाका मरत होते. हाक ऐकताच ताईबाईंनी हातातली भाकरी सोडून नदीकडे धाव घेतली. त्यांना समोर तिघं जण वाहून जाताना दिसले. ताराबाई आणि छबुराव, दोघं नदीच्या प्रवाहाच्या दिशेने धावत होते. बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी ताईबाई आजुबाजूला सामग्री शोधत होत्या मात्र त्यांना काही सापडलं नाही. ताईबाईंनी कसली ही परवा न करता आपल्या अंगावरील साडी फेडली. ती साडी त्यांनी नदीतून वाहून जाणाऱ्या भावांकडे फेकली. 
बुडणाऱ्यांना थोडासा आधार मिळाला. दोन भावांनी साडीला घट्ट पकडलं अ्न ताईबाई आणि छबुरावांनी दोघांना वर ओढलं..तीन भावांपैकी दोघं थोडक्यात बचावलले. मात्र एक भाऊ गोदावरीत वाहून गेला..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram