Uday Samant : कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक, भाजप-शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे उमेदवार
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप-शिंदे गटाकडून उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. म्हात्रे यांनी सीबीडीतील कोकण भवन कार्यालयात आपला अर्ज दाखल केला. त्यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण, उदय सामंत, आणि दीपक केसरकर यांच्यासह आमदार प्रशांत पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते. या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून बाळाराम पाटील उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत.
Tags :
Candidate Ravindra Chavan Uday Samant Nomination Form CBD Deepak Kesarkar Dnyaneshwar Mhatre Konkan Teachers Constituency For Election BJP-Shinde Kokan Bhawan