Sindhudurg Chipi Airport : कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी, नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
Continues below advertisement
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या उद्घाटन होतंय आणि या निमित्तानं एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र येतायत. विमानतळावर सुरु असलेल्या पोस्टर वॉरमुळे या कार्यक्रमात काय होणार? याची झलक पाहायला मिळाली आहे. आता खुद्द नारायण राणे यांनीच उद्याच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा देऊन वादाची नांदी दिलीय. शिवसेनेच्या हप्तेखोरांची नावं आपण उद्याच्या कार्यक्रमात जाहीर करू, असं सांगत राणेंनी वादाचे फटाके लावायला सुरुवात केली आहे.
Continues below advertisement