Konkan Railway Train Ganpati Booking:गणपतीसाठी कोकण रेल्वे फुल्ल,2 मिनिटात रेल्वे बुकिंग फुल्ल शक्य?
गणेशोत्सवासाठी जर कोकणात रेल्वेने जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर आता तुमच्या हातात काहीच येणार नाही. कारण गणपतीला गावी जाण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी बरोबर 11 वाजता ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी लॉग इन केलं. मात्र केवळ 2 मिनिटात बुकिंग वेबसाईटवर Regret असं लिहून आलं... जनशताब्दी, तेजस, मांडवी, मत्स्यगंधा, नेत्रावती, कोकणकन्या, तुतारी यापैकी आणि वसई रोड, पनवेल इथून जाणाऱ्या इतर एक्सप्रेसचं देखील एकही तिकीट आता उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांना आता प्रायव्हेट बसेस, एस टी बसेस नाहीतर स्वतःच्या गाड्यांचा पर्याय राहिलाय
दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी