Konkan Railway : पेडणे बोगद्यातील 50 % चिखल बाजूला करण्याचे काम पूर्ण

Continues below advertisement

Konkan Railway : पेडणे बोगद्यातील 50 % चिखल बाजूला करण्याचे काम पूर्ण कोकण रेल्वे (Konkan Railway ) मार्गावरील गोवा पेडणे बोगद्यात (Goa Pedne tunnel) मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला आहे. कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प (stopped) झाली आहे. सध्या 40 ते 45 टक्के चिखल बाजूला करण्याचं काम पूर्ण झालं आहे. दरम्यान, अजूनही 50 ते 55 टक्के चिखल बाजूला करण्याचं काम बाकी आहे.   कोकण रेल्वे प्रशासनाच्यावतीनं मोठ्या प्रमाणात बोगद्यातील चिखल बाजूला करुन पिशवीत भरुन ट्रेन च्या माध्यमातून बाहेर नेण्याचं काम सुरु आहे. त्यामुळं कोकण आणि गोव्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसला आहे. अजूनही ट्रॅक वरील चिखल बाजूला करण्याचं काम युद्धपातीवर सुरू आहे.   16 ते 17 तासांपासून वाहतूक  ठप्प कोकण रेल्वे मार्गावरील गोवा मधील पेडणे बोगद्यात ट्रॅक वर चिखल आल्याने गेल्या 16 ते 17 तासांपासून वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या बोगद्यातील बहुतांश चिखल बाजूला करून बाहेर काढला गेला आहे, अजूनही काही प्रमाणात ट्रॅक वर चिखल असून तो चिखल काढण्याचे काम सुरू आहे. गोण्या मध्ये चिखल, माती भरून मालगाडीच्या माध्यमातून बाहेर काढल येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram