Konkan Mhada Lottery : कोकण म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास एक महिन्याची मुदतवाढ ABP Majha

Continues below advertisement

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांच्या अर्जविक्री आणि स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. सोडतीत समाविष्ट होणाऱ्या अर्जांची संख्या दहा हजारांचा टप्पाही ओलांडण्याची शक्यता नसल्यानं कोकण मंडळावर अर्जविक्री आणि स्वीकृतीला एका महिन्यांची मुदतवाढ देण्याची नामुष्की आली आहे. आता इच्छुकांना १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबरची सोडत रद्द करण्यात आली असून आता १३ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram