Kolhapur Accident : भरधाव कारने तीन दुचाकींना उडवलं, तीन जण गंभीर जखमी तर तीन जणांनी जीव गमावला
Continues below advertisement
कोल्हापुरातील सायबर चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. राजारामपुरी आणि शिवाजी विद्यापीठ, राजाराम कॉलेजला जोडणाऱ्या या चौकात दिवसा मोठी गर्दी असते. तसेच या चौकाच्या बाजूला अनेक शाळा तसचे सायबर कॉलेजही आहे. अशात राजारामपुरीकडून आलेल्या एका भरधाव कारने अनेकांना धडक दिली. त्यापैकी टू व्हीलरवरील दोन-तीन जण तर हवेत उडाल्याचं दिसून आलं. तर ही कार पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला आदळली.
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामध्ये या चौकात इतर वाहने ही हळूहळू पुढे जाताना दिसत आहेत. तर ही एकच कार भरधाव वेगाने आली आणि तिने अनेकांना उडवलं. कोल्हापुरातील या घटनेमध्ये दोघांचा जागेवरच जीव गेला असून इतर तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement