Kolhapur : कोल्हापुरत विठ्ठल बिरदेव त्रैवार्षिक जळ यात्रेला सुरुवात, शेकडो भाविकांची उपस्थिती

कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वाघापूर इथल्या विठ्ठल बिरदेव त्रैवार्षिक जळ यात्रेस सुरुवात झाली आहे...विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलचा जयघोष करत... भंडाऱ्याची उधळण करीत शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली... या गावची जळयात्रा दर तीन वर्षांनी होते. वाघापूरच्या विठ्ठल बिरदेव यात्रेला 100 वर्षाहुन अधिक वर्षाची परंपरा आहे. होळी नंतर येणाऱ्या दुसऱ्या शनिवारी यात्रेला सुरुवात होते. यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेकडो धनगरी ढोलांचा निनाद, छत्र्या, अबदागिरी, धनगरी ओव्या मध्ये होणारा भंडारा उत्सव पार पडतो... या दरम्यान हजारो किलो भंडाऱ्याची उधळण होत असल्याने संपूर्ण परिसर पिवळाधमक झालेला पाहायला मिळतो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola