Gokul Election | गोकुळमध्ये पी एन पाटील यांची महादेवराव महाडिक यांना साथ | ABP Majha

 
कोल्हापूर दूध संघाची म्हणजे गोकुळची निवडणूक तोंडावर आली आहे. ठराव दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत, त्यामुळे ठराव जमा करण्यासाठी नेत्यांची लगबग सुरु झाली आहे. मात्र गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी स्वतः सतेज पाटील यांच्याकडे प्रस्ताव घेऊन जाणार असल्याचे पी एन पाटील यांनी म्हटले आहे. सतेज पाटील यांनी पी एन यांना सोबत येण्याचं आवाहन केलं होतं, मात्र पी एन हे महादेवराव महाडिक यांच्यासोबत राहिले. त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसमधील बंटी आणि पी एन वाद कायम असल्याचं समोर आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola