Kolhapur Flood : आधी लॉकडाऊनचा फटका,आता पुरामुळे नुकसान;कोल्हापुरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा 'माझा'वर
महापुरात ८ हजार व्यापारी उद्धवस्त झाले असून जवळपास सतराशे कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने व्यक्त केलाय. त्यामुळे महापुरात उद्धवस्त झालेल्या व्यापाऱ्यांना राज्य सरकारने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केलीय. या संदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातल्या व्यापाऱ्यांचं महापुरामुळे नुकसान झालंय. त्यामुळे महापुरात झालेली नुकसानभरपाई देण्याची मागणीही या पत्रामधून करण्यात आलीय. आधी कोरोना आणि लॉकडाऊननं व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं. त्यानंतर आता महापुराने व्यापारी पूर्णपणे उद्धवस्त झालाय. त्यामुळे सरकारने या व्यापाऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी गांधी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.वि