Kolhapur : नरबळीसाठी 6 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा संशय, 2 दिवस बेपत्ता मुलाचा मृतदेह घराशेजारीच
Continues below advertisement
Kolhapur च्या शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावात चिमुकल्याची हत्या करून मृतदेह घराशेजारी टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरव केसरे असं हत्या झालेल्या मुलाचं नाव असून त्याच वय 6 वर्षे आहे. रविवारी संध्याकाळपासून आरव बेपत्ता होता. घरातील नागरिक आणि गावकऱ्यांनी दोन दिवस शोधाशोध केली पण आरव काही मिळून आला नाही. आज पहाटे आरवचा मृतदेह केसरे यांच्या घराशेजारी आढळून आला. मृतदेहावर कुंकू आणि गुलाल टाकल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा भागात सुरू झाली आहे. कोल्हापूर पोलीस या हत्येचा तपास करत आहेत.
Continues below advertisement