Server Down : सात तासांच्या खोळंब्यानंतर WhatsApp Facebook आणि Instagram हळूहळू पूर्वपदावर

Continues below advertisement

Facebook, Instagram, WhatsApp Down : जगभरात व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तास ठप्प झाल्यानं नेटकरी हैराण झाले होते. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानं अनेक युजर्सना याचा फटका बसला. सोशल मीडिया अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर याचा खुलासा झाला. तब्बल सहा तासांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा पूर्ववत करण्यात आली असली तरी अद्यापही अनेक युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. कंपनीच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram