Kolhapur St Workers Strike : कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, प्रवाशांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांचं कोल्हापूरमधलं आंदोलन स्थगित करण्यात आलंय..प्रवाशांची गैरसोय होत असल्यानं हा निर्णय घेत असल्याचं एसटी कामगारांनी म्हटलंय..कोल्हापुरातले कर्मचारी आजपासून कामावर हजर राहणार आहेत..त्यामुळं कोल्हापुरातली एसटी सेवा आजपासून सुरळीत होणार आहे..विलिनीकरणाची मागणी कायम ठेऊन हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.