Martyr Jotiba Chougule | कोल्हापूरचे सुपुत्र जोतिबा चौगुले यांच्यावर आज अंत्यसंस्कार, पाकच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना वीरमरण | ABP Majha
पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड गोळीबाराला प्रत्युत्तर देताना कोल्हापुरातील उंबरवाडी-महागावचे सुपुत्र जोतिबा चौगुले शहीद झालेत. चौगुले यांच्यावर त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. जम्मूमधील गुरेज सेक्टरमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत जोतिबा चौगुले जखमी झाले होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांना वीरमरण आलं. त्यांनतर जोतिबा चौगुलेंचं पार्थिव आज त्यांच्या मूळगावी दाखल झालं आणि आता त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येताहेत. दरम्यान, चौगुले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील मोठा जनसागर लोटला होता. त्यावेळी जोतिबा चौगुले अमर रहे, अशा घोषणाही करण्यात आल्या..