Kolhapur : कोल्हापूरात राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात, सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजपासून राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतून 24 खेळाडू राष्ट्रीयस्तरावर पाठवण्यात येणार आहेत. कोल्हापूरचे शाहू छत्रपती, तलवारबाजी असोशिएसनचे अध्यक्ष, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेच उद्घाटन झालं आहे. या स्पर्धेतून निवड होणारे विद्यार्थी राष्ट्रीयस्तरावर चांगली कामगिरी करतील. तसेच महाराष्ट्रातले खेळाडू ऑलिंपिकमध्येही खेळतील असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.