Koregaon-Bhima issue | कोरेगाव-भीमा प्रकरणी तपासाबाबत पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचे : शरद पवार | ABP Majha

कोरेगाव-भीमाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. राज्य सरकारच्या गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक अक्षेपार्ह आहे. अशी तक्रार काही दिवसांपूर्वी विशेषतः जैन समाजाच्या लोकांनी केली होती. त्यामुळे ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे, याबाबत चौकशी झाली पाहिजे. याबद्दल चौकशीचा निर्णय घेण्याची प्रक्रिया ज्यावेळी येथे सुरू झाली. सकाळी 9 ते 11 बैठक झाली आणि 3 वाजता केंद्र सरकारने हे काम स्वतःकडे घेतलं. या घटनेनुसार कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे, असं असतानाही राज्याकडून अधिकार काढून घेणं योग्य नाही. तसेच त्यांनी जर काढून घेतलं तर महाराष्ट्राने त्याला पाठिंबा देणंही योग्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola