Kolhapur Rains | कोल्हापुरात पावसाचा जोर कायम; प्रयागचिखली, आंबेवाडीवर प्रशासनाचं लक्ष : सतेज पाटील
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फुटांवर पोहोचल्यावर नागरिकांचं स्थलांतर केलं जाईल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. प्रयाग चिखली आणि आंबेवाडी या दोन गावांवर अधिक लक्ष असेल. याआधी पाणीपातळी 43 फुटांवर पोहोचली तरी नागरिक स्थलांतर करत नव्हते. परंतु मागील वर्षी आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट इतकी आहे.