Kolhapur : सौजन्याची वारी...आली आपल्या घरी! शालेय विद्यार्थ्यांना मोफत वस्तूंचं वाटप ABP Majha
सौजन्याची वारी...आली आपल्या घरी!!! संजय घोडवत विद्यापीठाच्या विद्यार्थांनी तयार केलेला हा सौजन्याचा रथ कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरणार आहे .या रथमध्ये ग्रामीण भागातील मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे मोफत वाटप केले जाणार आहे...प्रत्येक गावात जाऊन तिथल्या मुलांना शालेय पुस्तके, नोटबुक, खेळाचे साहित्य दिले जाणार आहे. त्याच बरोबर शालेय गणवेश या रथाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. खास करून ग्रामीण भागातील आणि गरजू मुलांना आणि नागरिकांना फायदा कसा होईल याचा प्रयत्न केलाय.