Kolhapur Sangli Flood : पूर रोकण्यासाठी समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या
कोल्हापूर, सांगलीतला पूर रोखण्यासाठी कृष्णा नदी सरळ करण्याबाबत अभ्यास करण्याची शिफारस समितीनं केली असून ती राज्य सरकारनं स्वीकारल्याचं कळतंय. पूरावर उपाययोजना सूचवण्यासाठी सरकारनं समिती नेमली होती. या समितीनं केलेल्या अनेक शिफारसी राज्य सरकारनं स्वीकारल्या आहेत. त्यात नागमोडी वळणं घेणाऱ्या ठिकाणी नदी सरळीकरणाबाबत अभ्यास करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार कोल्हापूर, शिरोळ, इचलकरंजी भागात भुपृष्ठावरुन किंवा बोगद्याद्वारे सरळीकरण करण्याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे.