Shahu Maharaj | शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचं लोकर्पण, निमंत्रण न दिल्याने समरजितसिंह राजे नाराज | ABP Majha
शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं शरद पवार, बाळासाहेब थोरातांच्या हस्ते रविवारी लोकार्पण झालं... या कार्यक्रमाला महापालिकेकडून आमंत्रण न मिळाल्यानं समरजितसिंह राजे नाराज आहेत. तरी, आज नाराज समरजितसिंहराजे समाधी स्थळाचं दर्शन घेणार आहेत. त्यात निमंत्रण पत्रिकेत नाव तर नाहीच पण तोंडी निमंत्रणही दिलं नसल्यानं राजे नाराज आहेत. तरी, समरजितसिंह राजे शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार आहेत. त्यामुळे समाधीस्थळ लोकार्पण सोहळ्याला शाहू महाराजांच्या जनक घराण्याला वगळल्यानं सध्या नाराजीची भावना आहे.