JCB Wedding : कोल्हापुरात JCB मधून नवदाम्पत्याची वरात, हटके मिरवणुकीची जोरदार चर्चा
Continues below advertisement
कोल्हापूरच्या शिंगणापूर रोडवर संकेत आणि पूजा माने या नवदाम्पत्याची चक्क जेसीबीमधून काढलेली मिरवणूक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जेसीबी व्यावसायिक राजेश माने यांनी आपल्या मुलाची आणि सुनेची ही आगळीवेगळी वरात काढल्याचे सांगण्यात आले आहे. हा विवाह सोहळा आणि त्यानंतर निघालेली वरात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सजवलेल्या जेसीबीच्या बकेटमध्ये बसून या नवदाम्पत्याने मिरवणुकीचा आनंद घेतला, तर वऱ्हाडी मंडळी डीजेच्या तालावर थिरकताना दिसली. या अनोख्या वरातीची संपूर्ण कोल्हापूरमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू असून, याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement