Kolhapur Rain | कोल्हापूरात मुसळधार पाऊस, कळंबा तलावासह सर्व तलाव शंभर टक्के भरले
कोल्हापूरचा कळंबा तलाव यंदा जूनमध्येच ओव्हरफ्लो झाला आहे. दरवर्षी ऑगस्टमध्ये ओव्हरफ्लो होणारा हा तलाव यंदा मुसळधार पावसामुळे लवकर भरला. कोल्हापुरातील सर्व छोटे तलाव शंभर टक्के भरले असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत असून प्रशासन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे.