Kolhapur: मंदिर परिसरातील नियमबाह्य बांधकामाला स्थगिती ABP Majha
कोल्हापुरातील खोलखंडोबा मंदिर परिसरातील बांधकामाला महापालिकेच्या नगररचना विभागाने तात्पुरती स्थगिती दिली आहे... खोल खंडोबा मंदिर हे पुरातत्त्व विभागाच्या 'अ' वर्ग यादीत समाविष्ट आहे. असं असताना परिसरात खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम होतंय.याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने लावून धरल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे.. पुण्यातील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आणि तक्रारीची शहानिशा करुन करवाईचे आदेश दिले आहे. दरम्यान इथल्या बांधकामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.