Kolhapur Panchganga Mock Drill : पावसापूर्वी प्रशासन अलर्ट, कोल्हापूरमध्ये मॉकड्रिल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Panchganga Mock Drill : पावसापूर्वी प्रशासन अलर्ट, कोल्हापूरमध्ये मॉकड्रिल
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने पंचगंगा नदीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच प्रात्यक्षिक घेण्यात आलं... महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजूलक्ष्मी यांनी यात सहभाग घेतला. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असणाऱ्या बोटी, लाईफ सपोर्ट जॅकेट तसेच अन्य सामग्री सुस्थितीत आहेत का याची चाचपणी यानिमित्ताने करण्यात आली...शिवाय आपत्ती काळात नागरिकांना वाचवण्याचं प्रात्यक्षिक देखील करण्यात आलं. पावसाळ्यात वारंवार कोल्हापूरला महापुराचा फटका बसतो. महापुरात अनेक लोक आणि जनावर देखील अडकून पडतात...हे नुकसान टाळण्यासाठी आज महापालिकेच्या वतीने हे प्रात्यक्षिक घेण्यात आलं. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असणाऱ्या बोटी, लाईफ सपोर्ट जॅकेट तसेच अन्य सामग्री सुस्थितीत आहेत का याची चाचपणी यानिमित्ताने करण्यात आली.