Ajit Pawar Speech Mumbai : मुंबईतील बैठकीत अजित पवार यांचा काका शरद पवार यांच्यावर निशाणा
Ajit Pawar Speech Mumbai : मुंबईतील बैठकीत अजित पवार यांचा काका शरद पवार यांच्यावर निशाणा
पुणे: पुण्यातील अपघात प्रकरणानंतर शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्जच्या मुद्द्यावरुन रान उठवणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोमवारी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. या दोघांनी उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) अधिकाऱ्यांनी तुमचे सर्व आरोप साफ चुकीचे आहेत, असे म्हटले. त्यांच्या आरोपानंतर आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी त्यांना फैलावर घेतले. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही पापं करताय, तुम्हाला लय समजतं का, तुम्ही दर महिन्याला 70 ते 80 लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे. तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देता, याची माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का, तुम्ही पुणे उदध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, अशा एकापाठोपाठ प्रश्नांची सरबत्ती रवींद्र धंगेकर यांनी केली.