Kolhapur Navratri : खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन, शिवकालीन पूर्व, शिवकालीन शस्त्रांची पूजा
Continues below advertisement
नवरात्रीत खंडेनवमीला खूप महत्व आहे. देवीचा जागर झाल्यानंतर खंडेनवमी येते. आजच्या दिवशी नवमीला शस्त्रांची पूजा केली जाते. महाराष्ट्र आणि राजस्थानात आजची खंडेनवमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. कोल्हापुरातील शस्त्र अभ्यासक विनोद साळोखे यांनी आपल्या घरी हजारो शस्त्र संग्रहित केलीएत. त्यात शिवकालीन पूर्व, शिवकालीन आणि गेल्या शंभर वर्षातील शस्त्रांचा सहभाग आहे. याशिवाय वेगवेगळ्या देशातील शस्त्रंही इथे पाहायला मिळतात. खंडेनवमीच्या निमित्तानं सर्वात मोठं शस्त्रपूजन इथे दरवर्षी केलं जातं.
Continues below advertisement