Kolhapur : कळंबा करागृहात मोबाईल सापडला; सुरक्षायंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात ABP Majha
नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहातून एक बातमी हाती येतेय. कळंबा कारागृहात मोबाईल सापडल्यानं पुन्हा एकदा तिथल्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.. मोबाईल लपवण्यासाठी आरोपीनं चांगलीच शक्कल लढवली होती. त्यानं चपातीच्या गठ्ठ्यामध्ये मोबाईल लपवला होता.. दरम्यान जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय..