Kolhapur Lata Mangeshkar: कोल्हापूर आणि लतादीदींचं नातं, कोल्हापूरात साड्या, दागिन्यांची खरेदी ABP Majha
Continues below advertisement
लता मंगेशकर यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही.. काल त्यांना अखेरचा निरोप देताना संपूर्ण भारत गहिवरला.. मात्र त्यांचे सूर आणि आठवणी आपल्या सर्वांच्या मनात नेहमीच घर करून राहणार आहेत.. मंगेशकर कुटुंबीय तब्बल दहा वर्षे कोल्हापुरात एका भाड्याच्या घरात वास्तव्याला होतं. कोल्हापुरातल्या लक्ष्मण कारेकर यांच्या घरी १० रुपये भाडे देऊन मंगेशकर कुटुंबीय राहात होते. तीन खोल्यांच्या या छोटेखानी घरात लतादीदींसह आशा भोसले, उषा मंगेशकर, ह्रदयनाथ मंगेशकर या भावंडांचं बालपण गेलं.
Continues below advertisement