Kolhapur : नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना फाशी की जन्मठेप? आज फैसला अपेक्षित

Continues below advertisement

 9 बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना फाशी मिळणार की मरेपर्यंत जन्मठेप राहणार याबाबतचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात गाजलेल्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीनं विविध भागातून 13 बालकांचं अपहरण करून त्यांच्यापैकी 9 जणांची हत्या केली होती. 2001 साली त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र 20 वर्षांनंतरही या शिक्षेची अद्याप अमंलबजावणी न झाल्यानं जगण्याची उमेद वाढल्याचा दावा करत गावित बहिणींनी हायकोर्टात याचिका दाखल केलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram