Farmers Bharat Bandh | शेतकरी संघटनांचा भारत बंद, राजू शेट्टींकडून कृषी विधेयकांच्या प्रतीची होळी

मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. देशातील जवळपास 250 शेतकरी संघटना या विधेयकांच्या विरोधात आज रस्त्यावर उतरल्या आहेत. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी कृषी विधेयकांविरोधात आंदोलनं करत आहेत. या दोन्हीही राज्यांमध्ये काँग्रेसने आधीच आंदोलनाला सुरुवात केली आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, या विधेयकांमार्फत मोदी सरकार शेतकऱ्यांना कॉर्पोरेट जगतात अडकवत आहेत. यामुळे बाजारपेठेची व्यवस्था संपुष्टात येईल आणि शेतकऱ्यांना एमएसपी उपलब्ध होणार नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या कृषी विधेयकाची होळी आपल्या शिरोळ येथील निवासस्थानी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola