Kolhapur Circuit Bench | 42 वर्षांच्या लढ्याला यश, 6 जिल्ह्यांना मोठा फायदा!

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन थोड्याच वेळात होणार आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. गेल्या बेचाळीस वर्षांपासून कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचसाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमधील नागरिकांना मोठा फायदा होईल. मुंबई उच्च न्यायालयात या सहा जिल्ह्यांमधील जवळपास सत्तर हजार प्रलंबित खटले आता कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये चालवले जातील. न्यायमूर्ती एम एस कर्णिक, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे आणि न्यायमूर्ती एस जी चपळगावकर हे या बेंचवर न्यायमूर्ती म्हणून काम पाहतील. कोल्हापूर सर्किट बेंच १७ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे. हे खंडपीठ न्यायव्यवस्थेची कार्यक्षमता वाढवेल आणि नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचवेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola