Ganpati Aagman Sohala | चिंचपोकळीच्या Chintamani च्या आगमनाला तुफान गर्दी, पोलिसांसमोर आव्हान
मुंबईतील प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा सुरू झाला आहे. यंदा मंडळाचे १०६ वे वर्ष आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि मुंबईतून मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे. मुसळधार पाऊस असूनही गणेशभक्त रेनकोट आणि छत्र्या घेऊन उपस्थित आहेत. दोन किलोमीटरपर्यंत गणेशभक्तांच्या रांगा लागल्या आहेत. बाप्पाचे पहिले रूप डोळ्यात आणि मोबाईलमध्ये टिपण्यासाठी प्रत्येकजण आतुर आहे. या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणावर उपस्थित असून, प्रत्येक नागरिकाची काळजी घेत आहे. आगमन सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी पोलीस सज्ज आहेत. वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. लालबाग परळच्या कार्यशाळेतून गणपती निघून जेजे ब्रिजच्या दिशेने जाईल. पारंपरिक वादनाने सोहळ्याला सुरुवात झाली असून, गणेशभक्तांमध्ये उत्साह आहे. मुंबई पोलीस गर्दीला नियंत्रित करण्यासाठी देशभरातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पोलिसांनी चेंगराचेंगरीचा धोका टाळण्यासाठी रोड मॅपिंग केले आहे. हुल्लडबाजांवर AI कॅमेरे आणि CCTV द्वारे लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा गर्दी नियंत्रणासाठी तैनात आहे.