Kolhapur Flood कोल्हापूरच्या चिखली गावात पूर,ग्रामस्थांचं स्थलांतर, पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली
सातारा आणि कोल्हापुरात मागील २४ तासात पावसाचे जुलै महिन्यातले सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. कोल्हापुरात आज सकाळी ८:३० पर्यंत १८१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा उच्चांक २००५ साली बघायला मिळाला होता. ज्यात २६ जुलै २००५ साली १७४.२ मिमी पावसाची नोंद झाली होती.
तिकडे साताऱ्यात देखील सकाळी ८:३० पर्यंत १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ह्या आधी ७ जुलै १९७७ साली १२९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
२०१९ साली कोल्हापूर महापुरावेळी पंचगंगेची पातळी ५५.६ फुटांपर्यंत गेली होती. तर आता घाट माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे हीच पातळी ५६.३ फुटांपर्यंत गेली होती. कमी वेळात अधिकचा पाऊस झाल्याने ही परिस्थिती बघायला मिळत आहे. मात्र, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्याची पातळी कमी देखील होते आहे.