Kolhapur लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेले चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींचं वृद्धापकाळाने निधन
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
27 Aug 2021 09:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur : सीमाभागातल्या लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेले चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या नूल गावी त्यांची प्राणज्योत मालवली. सुरगीश्वर मठाचे ते मठाधीपती होती. मठाच्या माध्यमातून चंद्रशेखर शिवाचार्य यांनी ज्ञानदानाचं मोठं काम केलं होतं. परिसरातल्या उपेक्षित आणि गरीब मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी त्यांनी उचलली होती. गेल्या 50 वर्षांपासून या परिसरातल्या अनेक विद्यार्थ्यांची जडणघडण याच मठामुळे झाली. या मठाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये नामांकित आहेत.