CAA Protest | सीएएचा फटका फक्त मुस्लिमांनाच नाहीतर मागासवर्गियांनाही : शरद पवार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2020 01:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलन होत आहेत. त्यामुळे सर्व समाजांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलं आहे. अशातच सीएए काद्याला विरोध करणाऱ्यांमध्ये फक्त एकच समाज आहे, हे खरं नाही. या आंदोलनामध्ये सर्व समाजातील लोकं पाहायला मिळत आहेत. या प्रकरणी फक्त जागरूकता मुस्लिम समाजाने जास्त दाखवली आहे. सीएएचा फटका फक्त मुस्लिम समाजालाच नाहीतर मागासवर्गीयांनाही होऊ शकतो, असं शरद पवार कोल्हापूरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.