Ambabai Kiranostav Sohala | दक्षिणायन किरणोत्सव सोहळा, सूर्यकिरणांचा अंबाबाईच्या गळ्याला स्पर्श

दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मावळतीची किरणे करवीर निवासिनी अंबाबाईच्या गळ्यापर्यंत पोहोचली. सलग तीन दिवस सुरू असणाऱ्या या किरणोत्सव सोहळ्याचा काल दुसरा दिवस होता. दुसऱ्याच दिवशी सोनेरी किरणे देवीच्या गळ्यापर्यंत पोहोचल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. दरवर्षी हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात येत असतात. एलसीडीच्या माध्यमातून हा सोहळा नागरिकांपर्यंत पोहोचवला जातो. यंदा मात्र कोरोनाचे संकट असल्याने किरणोत्सवाच्या हा सोहळा भाविकांना ऑनलाईन पद्धतीनेच पाहता येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola