Kolhapur : कोल्हापूरकरांची चिंता वाढली! डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळल्याने खळबळ ABP Majha

कोल्हापूरकरांची चिंता वाढली असून डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळले असून कोल्हापूर शहरात 3 तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 रुग्ण अशी संख्या आहे.  दिल्ली येथील लॅबमध्ये पाठवलेल्या 100 नमुन्यांपैकी 7 डेल्टा प्लसचे रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच डेल्टा वाढल्याने खळबळ उडाली असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठवलेले हे नमूने होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola