Kokan Ganpati : डोक्यावर मूर्ती, हिरव्यागार शेतातून वाट काढत कोकणात गणपतीचं आगमन

Kokan Ganpati : डोक्यावर मूर्ती, हिरव्यागार शेतातून वाट काढत कोकणात गणपतीचं आगमन

कोकण असो कोळीवाडा सध्या गणेशोत्सवाची लगबग संपुर्ण महाराष्ट्रभर चालु आहे. भाद्रपदाच्या चतुर्थीला सारेजण गणरायाच्या रंगात रंगून जातात.  कारखान्यातून गणरायाची श्री मुर्ती आणण्यासाठी कुणी टेम्पो, रिक्षा, तर कुणी  मुर्ती डोक्यावर घेत पायी घेऊन घरी आणतात. विरारच्या पश्चिमेस असलेल्या अर्नाळा किल्ला या बेट असलेल्या गावी तर पुर्वापार प्रमाणे दरवर्षी विघ्नहर्ता गणरायाला दर्यापार करून यावं लागतं.  मोठ्या भक्तीभाव व हौसमौजेने इथले कोळी लोकं अर्नाळा, आगाशी वसई येथून गणपती बाप्पांची मूर्ती आणून, गणरायाला बोटीत बसवून दर्यापार अर्नाळा किल्ला गावी नेतात आणि  भक्तीभावाने पुजा करत मोठया उत्साहाने गौरीगणपतीचा सण  साजरा केला जातो.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola