Chipi Airport : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकमेकांना टाळलं?
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या उद्घाटन होतंय आणि या निमित्तानं एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र येतायत. परंतू या दोन्ही बड्या नेत्यांनी एकाच विमानानं प्रवास करणं टाळलंय का असा प्रश्न निर्माण होत आहे. दोन्ही नेते वेगवेगळ्या विमानांनी कोकणात दाखल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. नारायण राणे व केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे एक विमानाने तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विनायक राऊत दुसऱ्या विमानाने रवाना होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.