Kishor Gajbhiye : रामटेकमध्ये 13 एप्रिलला प्रकाश आंबेडकरांच्या दोन सभा - किशोर गजभिये
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKishor Gajbhiye : रामटेकमध्ये 13 एप्रिलला प्रकाश आंबेडकरांच्या दोन सभा - किशोर गजभिये प्रकाश आंबेडकर यांच्या 2 सभा रामटेक लोकसभा मतदारसंघात 13 एप्रिल ला होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी च्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांनी दिली आहे... त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या कालच्या रामटेक येथील सभेनंतर प्रकाश आंबेडकर यांचीही रामटेक लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे.. सत्ताधाऱ्यांकडून संविधान बदलण्यात येईल अशी भीती दलित आणि मुस्लिम समाजात दाखवण्यात येत असली, तरी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस कडून नेहमीच अशी भीती दाखवली जाते असा आरोप ही गजभिये यांनी केला... निवडणुकीच्या वेळी दलित -वंचितांना त्यांच्या मूलभूत प्रश्नापासून दूर करण्यासाठी हे बुजगावणे आणले जात असल्याचा आरोप ही गजभिये यांनी केला... दरम्यान, माझ्या उमेदवारीचा विरोधकांनी धसका घेतला असून उमरेड तालुक्यातील सिरसी गावात लावण्यात आलेले पोस्टर फडण्यात आले आहे.. याविरोधात वंचित च्या कार्यकर्त्यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार केल्याची माहिती ही गजभिये यांनी दिली...